Loksevak AI · मदत आणि सहाय्य केंद्र

काही अडचण आहे?
आम्ही तुमच्या मदतीसाठी तयार आहोत.

विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. तरीही तुमची शंका राहिल्यास आम्हाला ईमेल किंवा WhatsApp वर मेसेज करा; कामकाजाच्या २ दिवसांत (2 Working Days) तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल.

WhatsApp हेल्पलाइन+91 XXXXX XXXXX
पत्ताLoksevak AI, महाराष्ट्र

अकाउंट आणि लॉगिन (Account & Login)

तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर बरोबर असल्याची खात्री करा. SMS द्वारे OTP न आल्यास Get OTP on WhatsApp किंवा Call हा पर्याय निवडा. ३ मिनिटांनंतर तुम्ही पुन्हा नवीन OTP मागवू शकता.

तुमच्या मोबाइल किंवा संगणकाच्या ब्राउझरमध्ये app.loksevak.ai उघडा आणि तुमच्या मोबाइल नंबर व OTP ने लॉगिन करा. फोनवरील Chrome किंवा Safari मध्ये Add to Home Screen हा पर्याय निवडल्यास तुम्ही हे थेट ॲपप्रमाणे वापरू शकता. आमचे Android आणि iOS ॲप लवकरच उपलब्ध होत असून, तुमची अभ्यासाची सर्व प्रगती तिथेही सुरक्षित राहील.

ॲपमधील प्रोफाइल (Profile) विभागात जाऊन मोबाइल नंबर बदला हा पर्याय निवडा. तुमच्या नवीन नंबरवर पडताळणीसाठी OTP पाठवला जाईल आणि जुन्या नंबरवर सुरक्षिततेसाठी सूचना दिली जाईल.

होय. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने लॉगिन केल्यास तुमचा संपूर्ण डेटा आणि अभ्यासाची प्रगती तुमच्या अकाउंटशी जोडलेली असते. तुम्ही एका अकाउंटवरून दोन मोबाइल डिव्हाइस आणि वेब ब्राउझरवर अभ्यास करू शकता.

अभ्यास आणि राज्यव्यापी Live Test

ॲपमधील Live Test विभागात जाऊन फक्त एका क्लिकवर तुम्ही नोंदणी करू शकता. परीक्षेपूर्वी तुम्हाला आपोआप रिमाइंडर (Notification) पाठवला जाईल. आगामी राज्यव्यापी Live Test च्या तारखा नोंदणीकृत विद्यार्थ्यांना प्राधान्याने कळवल्या जातात.

सध्या आम्ही MPSC गट-क २०२६ परीक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच MPSC राज्यसेवा (गट-अ), संयुक्त गट-ब, पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती आणि इतर परीक्षांची तयारी टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. तुम्हाला कोणत्या परीक्षेची तयारी सर्वात आधी हवी आहे, हे आम्हाला नक्की कळवा.

आम्ही सर्व तारखा आणि माहिती आयोगाच्या अधिकृत जाहिराती व शुद्धिपत्रकांवरून अद्ययावत ठेवतो. तरीही आयोगाचे एखादे नवीन शुद्धिपत्रक प्रसिद्ध झाले असल्यास त्याची लिंक आम्हाला ईमेल किंवा WhatsApp वर पाठवा; आम्ही तात्काळ माहिती अपडेट करू.

तुमच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून ॲपमध्ये दररोजच्या उजळणीची एक ठरावीक मर्यादा दिलेली असते. परीक्षा जवळ आल्यावर उजळणीचा वेग आपोआप वाढतो; मात्र तुम्ही प्रोफाइल सेटिंग्जमधून तुमच्या सोयीनुसार रोजच्या कार्ड्सची संख्या बदलू शकता.

पेमेंट, रिफंड आणि Super Pack

ॲपमध्ये किंवा app.loksevak.ai वर Live Test विभागात एक टेस्ट (₹९९) किंवा २४ जानेवारीपर्यंतची संपूर्ण सिरीज (₹४९९) निवडा आणि UPI, कार्ड किंवा नेट बँकिंगने पेमेंट करा. पेमेंट झाल्यावर नोंदणी लगेच पक्की होते आणि पेपरआधी रिमाइंडर मिळतो.

नाही. Loksevak AI वर कोणतेही आपोआप रिन्यू होणारे सबस्क्रिप्शन नाही. ₹९९ ची एक Live Test किंवा ₹४९९ ची संपूर्ण सिरीज (१० टेस्ट), दोन्हींसाठी पेमेंट एकदाच करायचे असते.

नाही. एक टेस्ट, सिरीज किंवा Super Pack, कोणत्याही खरेदीवर परतावा नाही आणि नोंदणी रद्द करता येत नाही. टेस्ट चुकली तरी पैसे परत मिळत नाहीत; सिरीज घेतली असेल तर उरलेल्या टेस्ट नेहमीप्रमाणे देता येतात. तांत्रिक कारणाने आमच्याकडून टेस्ट झाली नाही, तर ती दुसऱ्या दिवशी पुन्हा घेतली जाते. म्हणून नोंदणीपूर्वी तारीख आणि वेळ नीट पहा. Super Pack साठी नाव नोंदणी मोफत आहे; जागा निश्चित झाल्यावरच शुल्क घेतले जाते आणि तेही परत मिळत नाही.

Super Pack साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाइन सत्रांच्या तारखा आणि ठिकाणाची माहिती अधिकृत WhatsApp वर कळवली जाते. तुम्हाला सत्रासाठी तुमचे शहर (पुणे, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर) बदलायचे असल्यास त्याच WhatsApp क्रमांकावर आम्हाला कळवा.

डेटा आणि अकाउंट सेटिंग्ज (Data & Account)

ॲपमधील प्रोफाइल > डेटा डाउनलोड करा (Export Data) या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या संपूर्ण अभ्यासाची आणि टेस्ट्सची प्रगती एकाच फाइलमध्ये डाउनलोड होईल.

तुम्ही मोबाइल ॲपमधील किंवा app.loksevak.ai वरील प्रोफाइल > अकाउंट डिलीट करा (Delete Account) या पर्यायावरून तुमचे अकाउंट आणि संबंधित डेटा कायमस्वरूपी डिलीट करू शकता. ईमेलने विनंती करावी लागत नाही.